Tree Plantation
Meeting Date | 14 Jul 2024 |
Meeting Time | 08:00:00 |
Location | Smrutivan Warje |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Tree Plantation |
Meeting Agenda | |
Chief Guest | |
Club Members Present | 24 |
Minutes of Meeting | १४ जुलै २०२४, रविवार सकाळी ८ ते ११ असे वाजता स्मृतीवन वारजे येथे आपल्या क्लबतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. रात्रभर जोरदार पाऊस पडत होता तरीही आपले ३४ सभासद सकाळी स्मृतीवनात हजर होते. किशोर मोहोळकर हे स्मृतीवनाचे काम व देखरेख पाहतात. त्यांनी आधीच सर्व व्यवस्था केली होती. खड्डे खणले होते. मोठी रोपे ४/५ फूट उंच आणली होती. अर्जुन, हिरडा, कांचन वगैरे. सर्वजण जमल्यावर फेलोशिप चेअर श्वेता पंचपोरने आणलेले गरमागरम कांदे बटाटे पोहे, प्रेसिडेंट राधाने आणलेले संतोषचे गरमागरम पॅटीस, मस्त चहा, बर्फी आणि संदीप शमाने अंनिव्हर्सरीच्या निमित्ताने आणलेल्या मोतीचुर लाडू याची भरपेट फेलोशिप झाली. वृक्षारोपण ही त्या आठवड्याची मीटिंग होती त्यामुळे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अनाउन्समेंट, झाल्या. कपल ऑफ द वीक वर्षाने किशोर मोहोळकर यांची ओळख करून दिली आणि विनीतने मोहोळकरांची मस्त मुलाखत घेतली. मोहोळकर यांनी त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागला इत्यादी सांगितले. सरकार दरबरापासून, फॉरेस्ट, डिफेन्स सर्व ठिकाणी झुंजावे लागले. वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाड लावले आणि आशीर्वाद घ्यायला, सुखदुःख सांगायला त्यांना एक छान ठिकाण मिळाले.किशोर मोहोळकर त्यांच्या आईमुळे वन संवर्धनाकडे वळले. छान घनदाट जंगल करण्याचा त्यांचा मानस आहे त्याला आपला खारीचा वाटा. स्मृतीवनाची सफर करुन खड्डे खणले होते तिथे जमलो. रोपे लावली. पाऊस पडतच होता पण जोर कमी झाला होता. वृक्षारोपण सोहळा एक छोटीशी पावसाळी सहल आणि एका चांगल्या कार्यात सहभागी होण्याचा योग जुळून आला. क्लबचे जुने, नवीन मेंबर्स व अजुनही जे सभासद होणार आहेत असेही वृक्षारोपण करायला पावसात भिजत आले मला सर्व्हिस डायरेक्टर म्हणून खूपच आनंद झाला. अश्या तऱ्हेने या वर्षीचा पहिला प्रोजेक्ट संपन्न झाला. आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले एका बीजापोटी, कोटी सुमने फळे |