Keertan ( कीर्तन)

Meeting Details

Meeting Date 06 Jul 2024
Meeting Time 19:30:00
Location Damle Hall
Meeting Type Regular
Meeting Topic Keertan ( कीर्तन)
Meeting Agenda आषाढी वारीच्या निमित्ताने हरिनामाच्या गजरात रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड च्या नवीन रोटरी वर्षाची सुरुवात कीर्तनाच्या कार्यक्रमाने झाली. रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर च्या सहयोगाने शनिवार दिनांक 6 जुलाई 2024 रोजी दामले हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला गेला.
Chief Guest Manasi Badawe
Club Members Present 37
Minutes of Meeting आषाढी वारीच्या निमित्ताने हरिनामाच्या गजरात रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड च्या नवीन रोटरी वर्षाची सुरुवात कीर्तनाच्या कार्यक्रमाने झाली. रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर च्या सहयोगाने शनिवार दिनांक 6 जुलाई 2024 रोजी दामले हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला गेला. विठुरायाची भव्य रांगोळी, तुळशीमाळ फुलांच्या सजावटीत मढवलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती, पारंपारिक वेशभूषेत आलेले सर्व सभासद आणि धूप दीपाच्या सुगंधात मंगलमय झालेले वातावरण! स्त्रियांनी नऊवारी लुगडी आणि खणा च्या, काठापदराच्या साड्या घालून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. हळदी कुंकू आणि अत्तर लावून सर्वांचे स्वागत झाले. तुळशी वृंदावन अन पालखी डोक्यावर घेऊन एक छोटी दिंडी विठूरायाच्या गजरात हॉलमध्ये आली आणि कीर्तनात सुरुवात झाली. राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कीर्तनकार सौ मानसी श्रेयस बडवे यांनी कीर्तनाला सुरुवात करताच त्यांचे स्पष्ट शब्दोच्चार तसेच खडा पण सुरेल आवाज ह्यांनी मानसीताईंनी सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना हार्मोनियम वर सौ मधुरा बडवे व तबल्यावर श्री सिद्धार्थ कुंभोजकर यांनी साथ दिली. एकंदरीत सगळे वातावरण वारीच्या सुगंधात आणि विठ्ठल भक्तीरसात बुडून गेले. रोटरी क्लब पुणे प्राइडच्या प्रेसिडेंट रो राधा गोखले, सेक्रेटरी रो हर्षवर्धन भावे तसेच रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगरचे प्रेसिडेंट रो अविनाश तरवडे व सेक्रेटरी रो राजकुमार बजाज यांनी सांस्कृतिक समितीच्या शमा, नेहा, धनश्री, भक्ती, रो सुनेत्रा आणि रो प्रवीण यांचे भरभरून कौतुक केले